जिंतूरमध्ये शिवसेनेतर्फे राजेश वट्टमवार यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
परभणी, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। जिंतूर नगरपालिकेंतर्गत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटातर्फे राजेश वट्टमवार यांनी आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल
जिंतूरमध्ये शिवसेनेतर्फे राजेश वट्टमवार यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल


परभणी, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।

जिंतूर नगरपालिकेंतर्गत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटातर्फे राजेश वट्टमवार यांनी आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी दाखल करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान पक्षाच्या घोषणा, समर्थकांच्या उत्साहाने परिसर दणाणून गेला. राजेश वट्टमवार यांनी नगरपरिषदेत पारदर्शक कारभार, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुधारित व्यवस्था, रस्त्यांचे मजबुतीकरण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त योजना राबविण्याचे आश्‍वासन व्यक्त केले.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत दिशादर्शन मिळाल्याने या उमेदवारीमुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा राजकीय कलाटणी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप आणि काँग्रेस या पक्षांकडून उमेदवारांची नोंद झाल्याने जिंतूरमधील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आणखी स्पष्ट झाली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande