पद्मश्री अ‍ॅड.उज्वल निकम यांची 19 नोव्हेंबर रोजी प्रकट मुलाखत
सोलापूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.): राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर गाजलेल्या विविध खटल्याचे विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्वल निकम यांची प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने बुधवार दि. 19 नोव्हेंबर रोज
पद्मश्री अ‍ॅड.उज्वल निकम यांची 19 नोव्हेंबर रोजी प्रकट मुलाखत


सोलापूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.): राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर गाजलेल्या विविध खटल्याचे विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्वल निकम यांची प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने बुधवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.25 वाजता श्री शिवछत्रपती रंगभवन मध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.माझा जीवन प्रवास जळगाव ते दिल्ली व्हाया मुंबई या अंतर्गत पद्मश्री खासदार अ‍ॅड उज्वल निकम यांची मुलाखत होणार असून माधव देशपांडे हे मुलाखत घेणार आहेत. जळगावचे सुपुत्र असलेले अ‍ॅड उज्वल निकम यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील पोलीस शिपाई धुळा कोळेकर या गाजलेल्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्याचबरोबर त्यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात तसेच राज्यातील आणि देशातील विविध खटल्यात सरकारची बाजू त्यांनी योग्य प्रकारे मांडून पिडीतांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या ते राज्यसभेचे सदस्य असून खासदार म्हणून त्यांनी नुकतेच कामकाज सुरू केले आहे. अशा या देशभक्ताचा जीवनप्रवास कसा आहे याचा उलगडा होवून आजच्या पिढीला मार्गर्शक ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande