इंद्रायणी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. सीमा काळभोरांची निवड प्रेरणादायी - अरुण बोऱ्हाडे
पुणे, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली डॉ. सीमा काळभोर यांची निवड महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी केले. पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावर, तीर्थक्षेत्र
इंद्रायणी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. सीमा काळभोरांची निवड प्रेरणादायी - अरुण बोऱ्हाडे


पुणे, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली डॉ. सीमा काळभोर यांची निवड महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे

प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी केले.

पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावर, तीर्थक्षेत्र आळंदी व देहू च्या कुशीत वसलेल्या आणि श्री नागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोशी गावात अहिल्याबाई होळकर साहित्य नगरी येथे चौथे एक दिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलन रविवारी (दि.२३ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान उच्चशिक्षित डॉ. सीमा सागर काळभोर यांना देण्यात आला आहे. त्या इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना झाल्यापासून संस्थेत सक्रिय आहेत. त्यांची निवड इतर महिला साहित्यिकांना देखील प्रेरणादायी असल्याचे अरुण बोऱ्हाडे यांनी सांगितले. अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून संमेलनाच्या या वर्षीच्या अध्यक्षपदाचा मान स्थानिक महिला साहित्यिकांना देण्याचा निर्णय परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला. डॉ. काळभोर यांनी विवाहानंतर वाचन, लेखन, भटकंती, सामाजिक कार्य तसेच साहित्यिकांशी संपर्कात राहून त्यांचे विचार ग्रहण करण्याची आवड जोपासत उच्च शिक्षण घेतले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१५ साली त्यांना पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीचे शिल्पकार माजी खासदार अण्णासाहेब मगर यांचे जीवन चरित्र म्हणजेच महाराष्ट्रातील ग्रामीण नेतृत्व आणि सहकार चळवळ अण्णासाहेब मगर विशेष अभ्यास या विषयावर पीएचडी पदवी प्रदान केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande