
सोलापूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याच्या संदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी खा. प्रणिती शिंदे यांनी आज मंगळवेढा दौरा केला. काँग्रेस कार्यालयात याबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी राज्यसचिव अॅड रविकिरण कोळेकर, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड नंदकुमार पवार,ऍड अर्जुनराव पाटील ,चेतन नरोटे, जेष्ठ नेते बबनराव आवताडे,सुरेश कोळेकर नाथा ऐवळे, दिलीप जाधव,राजाभाऊ मेतकुटे, अशोक चेळेकर,मारूती वाकडे,तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम भोजने, किसन सावजी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे, मनोज माळी आयेशा शेख सिद्धेश्वर दसाडे संदीप पवार आदीसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी सध्या मोठ्या शक्तीबरोबर लढायचे असल्यामुळे निवडणुकीत पक्षीय चिन्हावर लढावे की आघाडी करून लढावे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खा.प्रणिती शिंदे आपले मत जाणून घेण्यासाठी आल्या असून यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केल्यानंतर उपस्थितानी लोकसभेला सध्या आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसला मदत करण्याची भूमिका पार पाडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड