दिल्लीतील चार न्यायालये आणि दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर (हिं.स.)।दिल्लीतील अनेक जिल्हा न्यायालयांना आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) दोन शाळांना मंगळवारी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. धमकी मिळताच साकेत, द्वारका, पटियाल
दिल्लीतील चार न्यायालये आणि दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी


नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर (हिं.स.)।दिल्लीतील अनेक जिल्हा न्यायालयांना आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) दोन शाळांना मंगळवारी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. धमकी मिळताच साकेत, द्वारका, पटियाला हाऊस आणि रोहिणी येथील न्यायालये तात्काळ रिकामी करण्यात आली आणि संपूर्ण परिसरात सखोल तपास मोहीम राबवण्यात आली. बॉम्ब धमकीमुळे न्यायालयीन कामकाज तात्काळ थांबवण्यात आले. सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि भेट देणारे नागरिक यांना लगेच इमारतीबाहेर हलवले गेले.

बॉम्ब निष्क्रिय पथके आणि सुरक्षाकर्मी यांनी संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. पटियाला हाऊस कोर्टात विशेष सुरक्षेची तरतूद करण्यात आली होती, जिथे बॉम्ब निष्क्रिय पथकाने तपासणी केली. सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यावर, दुपारच्या भोजनानंतर पुन्हा न्यायालयीन कामकाज सुरू करण्यास परवानगी मिळू शकते, अशी माहिती देण्यात आली.साकेत कोर्ट बार असोसिएशनचे मानद सचिव, अॅडव्होकेट अनिल बसोया यांनी जारी केलेल्या सूचनेत सदस्यांना कळवण्यात आले की सुरक्षा समस्येमुळे पुढील दोन तासांसाठी सर्व न्यायालयीन कामकाज तात्पुरते स्थगित केले गेले आहे. सूचनेत सर्व सदस्यांना शांत राहण्याचे, अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आणि अनावश्यक गर्दी किंवा गोंधळ टाळण्याचे आवाहन करण्यात आले.

त्याचवेळी रोहिणी आणि पटियाला हाऊस कोर्टांमध्येही तपास मोहीम सुरू आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपी जसीर बिलाल उर्फ दानिश याची पेशी होण्यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टात बॉम्ब निष्क्रिय पथक आणि डॉग स्क्वॉड तपासणी करत आहेत. ही पहिली वेळ नाही की दिल्लीतील न्यायालयांना अशा धमक्या मिळाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये दिल्ली उच्च न्यायालयालाही बॉम्ब धमकीचा ईमेल आला होता, ज्यामुळे न्यायाधीशांना तातडीने न्यायालय सोडावे लागले होते आणि परिसर रिकामा करण्यात आला होता. या घटनांनी न्यायालयांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.

दरम्यान, मंगळवारी सकाळी दिल्लीतील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीफ) दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी भरले ईमेल मिळाले, ज्यामुळे खळबळ उडाली. मात्र सखोल तपासणीनंतर ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आणि कोणताही धोका नसल्याचे समोर आले.ही घटना सकाळी सुमारे 9 वाजता घडली, जेव्हा प्रशांत विहार आणि द्वारका येथील सीआरपीफ शाळांना एकाच वेळी ईमेलद्वारे धमकी पाठवण्यात आली. माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा आणि स्थानिक पोलिस तत्काळ सक्रिय झाले.धमकीनंतर दोन्ही शाळा तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आणि संपूर्ण परिसरात सखोल शोधमोहीम चालवली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की दोन्ही शाळांची पूर्ण तपासणी करण्यात आली, पण काहीही संशयास्पद आढळले नाही. प्राथमिक तपासणीत हे प्रकरण खोटी धमकी असल्याचे घोषित करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

 rajesh pande