मुखेड नगराध्यक्ष पदासाठी 12 उमेदवारांनी दाखल केली उमेदवारी
122 उमेदवार नगरसेवक पदासाठी
अ


नांदेड, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।

मुखेड नगराध्यक्ष पदासाठी 12 उमेदवारांनी व 122 नगरसेवक उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे

मुखेड नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीचे अधिकृत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज सादर केले.

मुखेड शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा प्राधान्याने पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते-विकास, नव्या संधींना वाव देणारी पायाभूत सुविधा आणि महिला व युवक सक्षमीकरण यांसारखे अनेक मुद्दे आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यसूचीतील महत्त्वाचे घटक असतील. असे भाजपा आमदार तुषारर राठोड यांनी सांगितले

भाजपच्या वतीने अध्यक्ष पदासह 20 नगरसेवक उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज विधिवत भरण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

रॅलीदरम्यान उमेदवारांचा उत्साह, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पक्षाचा ताकदवान जल्लोष यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीची रंगत अधिक वाढली.

यावेळी भाजपा विधानसभा प्रमुख खुशालराव पाटील उमरदरीकर, माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड, पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव पाटील, चंद्रकांत गरुडकर, सचिन पवार सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis

 rajesh pande