छ.संभाजीनगर : पदवीधर मतदारसंघासाठी सुधारित कार्यक्रम जाहीर
छत्रपती संभाजीनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।उपसिचव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी नमुना क्र.18 च्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली असून सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानूसार हस्तलि
छ.संभाजीनगर : पदवीधर मतदारसंघासाठी सुधारित कार्यक्रम जाहीर


छत्रपती संभाजीनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।उपसिचव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी नमुना क्र.18 च्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली असून सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानूसार हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई दि.28 नोव्हेंबर 2025, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दि.3 डिसेंबर 2025, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.3 ते 18 डिसेंबर 2025 राहील. दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार व छपाई दि.5 जानेवारी 2026 रोजी करण्यात येईल. तसेच यादीची अंतिम प्रसिध्दी 12 जानेवारी 2026 रोजी करण्यात येईल. अशी माहिती प्र.उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुकेशिनी कांबळे-पगारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande