राजस्थानचे राज्यपाल बागडे यांच्या हस्ते लाडसावंगी उपबाजार पेठचे भव्य उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।लाडसावंगी येथे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यांच्या लाडसावंगी उपबाजार पेठचे भव्य उद्घाटन राजस्थानचे राज्यपालहरिभाऊ बागडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब
शेतकरी व कामगार यांच्या श्रमातून कृषीपूरक व्यवस्था


छत्रपती संभाजीनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।लाडसावंगी येथे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यांच्या लाडसावंगी उपबाजार पेठचे भव्य उद्घाटन राजस्थानचे राज्यपालहरिभाऊ बागडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपबाजारपेठेच्या परिसरात मुख्य प्रवेशद्वाराशेजारी पेट्रोल पंप, मुख्य रस्त्यावर व्यापारी गाळे, फूड प्रोसेसिंग युनिट, कृषीमाल साठवणुकीसाठी वेअरहाऊस तसेच शेतमाल पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी सेल हॉल अशा महत्त्वपूर्ण सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या सुविधा शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारांना सुकरता मिळवून देणार असून बाजार समितीच्या कार्यक्षमता वृद्धीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

मुख्य रस्त्यालगत उभारण्यात येत असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स हे बैठका, व्यवहार आणि कृषीविषयक चर्चांसाठी एक सुसज्ज सुविधा म्हणून कार्य करणार आहे. नव्याने उभारण्यात येणारी वेअरहाऊस व्यवस्था आणि सेल हॉल कृषीमाल व्यवस्थापन व विक्री प्रक्रियेस आवश्यक ती गती देणार आहेत. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.शेतकरी व कामगार यांच्या श्रमातून कृषीपूरक व्यवस्था सक्षम राहते. त्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेली ही विकासकामे स्थैर्य, सुसंवाद आणि सर्वांगीण प्रगतीस सहाय्यभूत ठरणारी आहेत.कार्यक्रमास सभापती श्री.राधाकिसन बापू पठाडे, रामबाबा शेळके, रामराव शेळके, बाजार समितीचे उपसभापती मुरली चौधरी, सर्व सन्माननीय संचालक, परिसरातील शेतकरी व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande