करमाड–बिडकीन मार्गे समृद्धी महामार्ग ६ पदरी जोडणी या ग्रीनफिल्ड रस्त्यालाही तत्त्वतः मंजुरी
छत्रपती संभाजीनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे–शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील ५३.४ किलोमीटर अंतरातील चार पदरी ‘ॲट ग्रेड’ आणि सहा पदरी उन्नत महामार्ग, तसेच फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील शेंद्रा ते बिडकीन आणि बिडकीन ते ढोरेगाव या सहा पदरी रस्ता निर्म
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता


छत्रपती संभाजीनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे–शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील ५३.४ किलोमीटर अंतरातील चार पदरी ‘ॲट ग्रेड’ आणि सहा पदरी उन्नत महामार्ग, तसेच फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील शेंद्रा ते बिडकीन आणि बिडकीन ते ढोरेगाव या सहा पदरी रस्ता निर्मिती प्रकल्पांना मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर–जालना डीएमआयसी नोड क्रमांक १ करमाड–बिडकीन मार्गे समृद्धी महामार्ग ६ पदरी जोडणी या ग्रीनफिल्ड रस्त्यालाही तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर दरम्यानच्या विद्यमान रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील शेंद्रा (करमाड)–बिडकीन या ३२.८ किमी आणि बिडकीन–ढोरेगाव या २६ किमी लांबीच्या सहा पदरी रस्ता निर्मितीसाठी आवश्यक भूसंपादन तातडीने सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले.

शेंद्रा–बिडकीन आणि बिडकीन–ढोरेगाव या दोन्ही सहा पदरी रस्ता प्रकल्पांचे प्रस्ताव श्री.अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी तयार केले आहेत.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande