जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कापूस खरेदीचा शुभारंभ
जालना, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कापूस खरेदीचा शुभारंभ आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी प्रथम कापूस विक्री करणारे शेतकरी तसेच खरेदी करणारे व्यापारी यांचा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते
अ


जालना, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कापूस खरेदीचा शुभारंभ आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

या वेळी प्रथम कापूस विक्री करणारे शेतकरी तसेच खरेदी करणारे व्यापारी यांचा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांना 8060 रुपये प्रतिक्विंटल असा भाव देण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि अडचणी आमदार खोतकर यांच्यासमोर व्यक्त केल्या.

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकताच आमदार अर्जुनराव खोतकर यांनी पणनमंत्री जयकुमार रावल तसेच कृषीमंत्र्यांशी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, शेतकऱ्यांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण व्हावे, यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande