
जालना, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
स्वस्त धान्य दुकादारांचा कमिशनचा विषय आमदार अर्जुनराव खोतकर यांनी मार्गी लावला. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने जालना परिसरातील दुकानदारांच्या कमिशनविषयक प्रश्नाबाबत काही दिवसांपूर्वी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या कडे निवेदन सादर केले होते. विषयाचे गांभीर्य ओळखत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी तात्काळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनचा प्रश्न तत्काळ मार्गी लागला. दर्शना बंगला येथे स्वस्त धान्य दुकानदारांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांचा सत्कार करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या वेळी उपस्थित राशन दुकानदारांनी— “आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष – विश्वनाथ बालाजी ढवळे, सचिव – नारायण गणपत काळे, दुकानदार – रामचंद्र फुलझाडे, शिवाजी वाढेकर, सुभाष घाडगे, बाबा चव्हाण आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis