
छत्रपती संभाजीनगर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील निधोना येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा शुभारंभ झाला. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला .
गावातील पाणीसंवर्धन, सामाजिक सुविधा, तांडा-वस्ती विकास आणि सभागृह उभारणी अशा सर्व स्तरांवर संतुलित विकास साधण्यासाठी या कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये—
• सिमेंट बंधारा – ₹६० लाख
• समशानभूमी सुशोभीकरण – ₹२० लाख
• तांडा वस्ती सुधार योजना – ₹२० लाख
• सामाजिक न्याय सभागृह – ₹१५ लाख
• दलित वस्ती सुधार योजना – ₹१६ लाख अशा महत्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे.
याप्रसंगी श्री जितेंद्र बाबा जैस्वाल, श्री.सर्जेराव मेटे, सुमनताई राऊतराय, राधाताई गाडेकर, श्री.पाथरे बाबा, श्री.मनोहर सोनवणे, श्री.प्रवीण वाघ, भागूताई काकडे, कौशल्याताई जंगले, सुरेखाताई काथार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis