जालना जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
जालना ,20 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. 13 डिसेंबर, 2025 रोजी जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपआपसातील वाद
जालना जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन


जालना ,20 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. 13 डिसेंबर, 2025 रोजी जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपआपसातील वाद तडजोडीने मिटविण्यासाठी नागरिकांनी लोकअदालतीचा लाभ घ्यावा.

मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकारी न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणे आदिसाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष वर्षा मोहिते व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande