रत्नागिरी : चिपळूण पालिकेककडून १३ किलो प्लास्टिक जप्त, १५ व्यावसायिकांवर कारवाई
रत्नागिरी, 3 नोव्हेंबर, (हिं. स.) : प्लास्टिक वापरावर शासनाने घातलेली बंदी धाब्यावर बसवून बाजारपेठेत प्लास्टिकचा वापर सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर चिपळूण नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत १५ व्यावसायिकांकडून १३ किलो प्लास्टिक जप्त क
चिपळूण पालिकेककडून १३ किलो प्लास्टिक जप्त


रत्नागिरी, 3 नोव्हेंबर, (हिं. स.) : प्लास्टिक वापरावर शासनाने घातलेली बंदी धाब्यावर बसवून बाजारपेठेत प्लास्टिकचा वापर सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर चिपळूण नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत १५ व्यावसायिकांकडून १३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि पर्यावरणास होणारे नुकसान लक्षात घेता शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. तरीदेखील बाहेरून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक येत असून स्थानिक व्यावसायिकांकडून त्याचा वापर सुरू आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी नगरपालिका वेळोवेळी कारवाई करत असली तरी पूर्णपणे बंदी अजून लागू झालेली नाही. त्यामुळे प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर थेट कारवाई करण्याची मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे.

शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सातत्याने कारवाईच्या सूचना पालिकेला येत असल्याने मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे व मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, तसेच दीपक किंजळकर, रोहन सकपाळ, राजेंद्र नवरथ, मनीष जाधव आणि ५ स्वच्छतादूतांच्या पथकाने मिळून ही कारवाई केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande