जळगावमध्ये प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शन : भाजपा खासदार स्मिता वाघ
जळगाव, 3 नोव्हेंबर (हिं.स.) गेल्या तीस वर्षा पासून रखडलेले पाड़ळसरे धरणाचा प्रश्न मार्गी लावत ८५९ कोटिंची तरतूद करून आणली. अलीकडे नव्या इमारतीने रूपडे बदलनारे जळगाव विमानतळ महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकावर असून आता त्याला कार्गो करण्याचा माझा प्रयत
जळगावमध्ये प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शन : भाजपा खासदार स्मिता वाघ


जळगाव, 3 नोव्हेंबर (हिं.स.) गेल्या तीस वर्षा पासून रखडलेले पाड़ळसरे धरणाचा प्रश्न मार्गी लावत ८५९ कोटिंची तरतूद करून आणली. अलीकडे नव्या इमारतीने रूपडे बदलनारे जळगाव विमानतळ महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकावर असून आता त्याला कार्गो करण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रगतिशील महाराष्ट्र 2025 हे त्या विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल असून केंद्र सरकारपर्यन्त जाऊ न शकणाऱ्या नागरिकांना केंद्रीय खात्यांच्या योजना कळाव्यात म्हणूनच हे प्रदर्शन आयोजित केल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले.

दिल्ली येथील फ्रेंड्ज़ एक्झिबिशन एंड प्रमोशनच्या वतीने येथील शिवतीर्थ – जी एस ग्राउंडवर आयोजित केलेल्या प्रगतिशील महाराष्ट्र 2025 या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात त्या उद्धघाटक म्हणून बोलत होत्या. यावेळी मंचावर आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (पश्चिम) डॉ. राधेश्याम चौधरी, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव केतकी पाटील, रायसोनी कोलेजच्या डायरेक्टर डॉ. प्रीती अग्रवाल, शासकीय अभियांत्रिकी कोलेजचे प्राचार्य सुहास गाजरे, पोदार इण्टरनेशनल स्कूलचे प्राचार्य गोकुळ महाजन, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगावचे चीफ जनरल मैनेजर एम. झेड. सरवर जळगावच्या माजी महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, डीआरडिएचे प्रकल्प संचालक राजेंद्र लोखंडे, डॉ. रितेश पाटील, फ्रेंड्ज़ एक्झिबिशनच्या प्रोजेक्ट हेड अखिला श्रीनिवासन, रीजनल हेड दत्ता थोरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

अतिशय थाटात सुरु झालेल्या या प्रदर्शनाचा शुभारंभ पोदार इंटरनैशनल स्कुलच्या विद्यार्थ्यानी पहाड़ी आवाजात गायिलेल्या महाराष्ट्र गीतांने झाली. उद्धघाटनानंतर बोलताना आ. राजू मामा उर्फ सुरेश भोळे म्हणाले की, खा. स्मिता वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकास पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कल्पकते तुन साकारलेले हे प्रदर्शन कृषि, शिक्षण, टेक्नोलॉजी, आरोग्य याच्या महितीने समृद्ध आहे. बांबूची भाजी असते हे मला पहिल्यांदाच कळाले. या वैविध्यपूर्ण प्रदर्शनाला सगळ्या जळगाव करानी भेट द्यावी असेही ते म्हणाले. आज दिवसभर जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त मा. ज्ञानेश्वर ढेरे, पिपल बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सरिता माळी, जे. डी. सी. सी. बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज तसेच विविध विभागांचे अधिकारी, विविध पक्षातील पदाधिकारी, शहरातील नागरिक व विविध शाळा महाविद्यालायाच्या विद्यार्थ्यानी भेट दिली. पहिल्या दिवशी जवळपास साडेपाच हजाराहूंन अधिक लोकांनी भेट घेऊन माहिती घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande