सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतक-याकरिता निधी उपलब्ध आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन बाबीकरिता अर्ज मागविण्यास
सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी  अर्ज करण्याचे आवाहन


सोलापूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतक-याकरिता निधी उपलब्ध आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन बाबीकरिता अर्ज मागविण्यासाठी दि. 03 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2025 कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

या अनु.जाती व जमाती शेतक-यांनी जास्तीत जास्त प्रमाणात महाडीबीटी पोर्टलवर योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande