
परभणी, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।
अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे आयोजित दहावा मोफत वधू-वर मेळावा रविवार 9 नोव्हेंबर रोजी नांदखेडा रस्त्यावरील गंगा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन बंडू नाना सराफ यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सचिन वाडे पाटील, स्वागताध्यक्ष म्हणून दीपक कासांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राहुल आंबेगावकर, नरहरी शास्त्री एरंडेश्वरकर, योगेश जोशी (सोनपेठकर), सुरेंद्र नेब, व्यंकटेश शर्मा, लक्ष्मीकांत दडके, धनंजय नारळे, मोरेश्वर मार्डीकर, संतोष जोशी, विजय काजे, काशीनाथ चांदकर, संदेश देशपांडे आणि विवेक जोशी आदींची उपस्थिती राहणार आहे.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विशाल जोशी, प्रदीप जोशी, रोहीत कनकदंडे, नागनाथ नरळदकर, कृष्ण कनकदंडे, आनंद रामपुरकर, शिवाजी पाटोदाकर, पराग चौधरी, राम शास्त्री, शिवाजी भाले, रमाकांत जोशी, शंतनु जोशी, सखाराम जोशी, महेश देशमुख, पराग चौधरी हे परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, या मेळाव्या करीता नोंदणीची वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात आली असून या मेळाव्यात सहभागी होणार्या सर्व इच्छुकांनी वेळेत नोंदणी करून या सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या पदाधिकार्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis