नांदेड : कौठा गावाजवळ मोठ्या पुलाच्या बांधकाम कामाचे भूमिपूजन
नांदेड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड केंद्रीय मार्ग निधी सन 2025 - 26 (3054 मार्ग व पुल 04 जिल्हा मार्ग) धानोरा - कौठा - शिरसी - पेठवडज -कल्याळी - रुई रस्त्यावरील कौठा गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करणे या काम
अ


नांदेड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड केंद्रीय मार्ग निधी सन 2025 - 26 (3054 मार्ग व पुल 04 जिल्हा मार्ग) धानोरा - कौठा - शिरसी - पेठवडज -कल्याळी - रुई रस्त्यावरील कौठा गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी देगलूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाषराव साबणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, बाबुराव देशमुख कौठेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande