व्यंकटराव कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिटणीसपदी नियुक्ती
परभणी, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत माजी आमदार व्यंकटराव आनंदराव कदम यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत जयवंतराव शिंदे यांनी
व्यंकटराव कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिटणीसपदी नियुक्ती


परभणी, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत माजी आमदार व्यंकटराव आनंदराव कदम यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत जयवंतराव शिंदे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र जारी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार यांच्या मान्यतेने सोनपेठ येथील माजी आमदार व्यंकटराव कदम यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा आज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी केली.

या नियुक्तीबद्दल महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा खासदार फौजिया खान, माजी मंत्री जयप्रकाश दांडगावकर, मराठवाडा प्रभारी व माजी आमदार विजयराव गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता डॉ. भीमराव हत्तीअंबिरे, जिल्हाध्यक्ष अजयराव गव्हाणे, शिक्षक सेलचे राज्यप्रमुख प्रा. किरण सोनटक्के आदींनी कदम यांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande