जळगाव - चार तासात चोरलेल्या दुचाकीसह चोरटा जेरबंद
जळगाव, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) पाचोरा शहरातील जारगाव चौगुले येथून चोरीस गेलेली दुचाकींचा अवघ्या चार तासांत शोध लावून चोरट्यालाही ताब्यात घेण्याची कारवाई पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत ४ नोव्
जळगाव - चार तासात चोरलेल्या दुचाकीसह चोरटा जेरबंद


जळगाव, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) पाचोरा शहरातील जारगाव चौगुले येथून चोरीस गेलेली दुचाकींचा अवघ्या चार तासांत शोध लावून चोरट्यालाही ताब्यात घेण्याची कारवाई पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत ४ नोव्हेंबर रोजी दुपारी दिड वाजेच्या दरम्यान मनोज डिगंबर जाधव रा. भोजे चिंचपुरे हे जारगांव चौफुली येथे त्यांची बजाज कंपनीची काळया रंगाची प्लॅटीना मो.सा. क्रमांक एम.एच. – १९ सी. पी -०८६९ ही पार्क करुन फळ घेण्यासाठी गेले. कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे संमतीशिवाय लबाडीचे इरादयाने मोटार सायकल ही चोरी करुन चोरुन घेवुन गेले. या बाबत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचे अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. हे. कॉ. राहुल शिंपी, पो. कॉ. योगेश पाटील, पो. कॉ. शरद पाटील, पो कॉ. गणेश कुवर, पो. कॉ. श्रीराम शिंपी यांनी सी. सी. टी. व्ही. फुटेज व गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तसेच गुन्हयाचा तपास चालु असतांना संशयीत इसम हा कृष्णपुरी परीसरात फिरत आहे अशी गुप्त बातमीदाराने पो कॉ. योगेश पाटील यांना माहिती मिळाल्याप्रमाणे कृष्णपुरी येथे जावुन सापळा रचून असता एक इसम संशयीतरित्या फिरणाऱ्याला ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, गाव विचारता त्याने त्याचे नाव भगवान लक्ष्मण पाटील, वय. ३५ वर्षे, रा. पिंप्री खुर्द प्र. ता. पाचोरा असे सांगितले. त्याला विश्वासात घेवुन पोलीस ठाणे येथे आणुन त्याची गुन्हयाचे संदर्भात प्राथमिक चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याने गुन्हयात चोरलेली ४५ हजार रुपये किंमतीची एक बजाज कंपनीची काळया रंगाची प्लॅटीना मो.सा. क्रमांक एम. एच. – १९ सी. पी. -०८६९ ही त्याने चोरी केल्याचे काबुल करून त्याच्याकडून मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande