जळगाव - कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये हद्दपार आरोपीला पकडले
जळगाव, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) - शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ दरम्यान हद्दपार आरोपीला शनिपेठ पोलिसांनी गाठत ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये दडपण आले असू
जळगाव - कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये हद्दपार आरोपीला पकडले


जळगाव, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) - शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ दरम्यान हद्दपार आरोपीला शनिपेठ पोलिसांनी गाठत ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये दडपण आले असून पोलिसांच्या सजगतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर, जळगाव) असे आहे.

हद्दपार असूनही तो शहरात वावरत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळताच तातडीने कारवाई करण्यात आली. रात्री उशिरा राबविलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी सोनवणेला पकडण्यात यश मिळविले. ही कारवाई पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

उपनिरीक्षक योगेश ढिकले, सहाय्यक फौजदार रघुनाथ पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण, योगेश जाधव, रवींद्र इंदाटे आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश साबळे, निलेश घुगे, गजानन वाघ या पथकातील जवानांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande