महिलेनं हातचलाखीने सोन्याच्या अंगठ्या घेऊन केला पोबारा
जळगाव, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून एका महिलेनं हातचलाखीने साडेचार लाखांच्या सोन्याच्या अंगठ्या घेऊन पोबारा केला. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे संशयित महिलेचा शोध सुरू केला संशयित महिल
महिलेनं हातचलाखीने सोन्याच्या अंगठ्या घेऊन केला पोबारा


जळगाव, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून एका महिलेनं हातचलाखीने साडेचार लाखांच्या सोन्याच्या अंगठ्या घेऊन पोबारा केला. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे संशयित महिलेचा शोध सुरू केला संशयित महिला मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचा तर्क काढला गेला आहे. त्या दृष्टीने पोलीस तपासाची चक्रे फिरवली गेली आहेत.महिलेने सर्वात आधी शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्समध्ये चोरीचा यशस्वी प्रयत्न केला होता. अंगठ्या ठेवण्याच्या ट्रे मधील सोन्याच्या अंगठ्या काढून त्या जागी तिच्याकडील दोन नकली ठेवून एक लाख ८५ हजार रूपये किमतीच्या दोन अस्सल सोन्याच्या अंगठ्या घेऊन पोबारा केला. सेल्समन गिरीष जैन यांच्या लक्षात आल्यांनतर सीसीटीव्हीचे चित्रण तपासले असता, त्यात ही चोरी दिसून आली.

या प्रकरणी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक संतोष काळे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याशिवाय, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एक नोव्हेंबरला दाखल तक्रारीनुसार जळगावमधील पु. ना. गाडगीळ सुवर्ण पेढीतुनही एका महिलेने १० ग्रॅम वजनाची एक लाख ४० हजार किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. तिन्ही सुवर्ण पेढ्यांमधील चोरीच्या घटनांचे साम्य लक्षात घेता एकाच महिलेचा त्यात हात असल्याचा संशय बळावला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे त्या महिलेचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासले असता, सदर महिला जळगाव रेल्वे स्थानकापर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. मागील काही घटना लक्षात घेता संशयित महिला मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचा तर्क काढला गेला असून, त्या दृष्टीने पोलीस तपासाची चक्रे फिरवली गेली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande