पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार नवीन वंदे भारत ट्रेनना दाखवला हिरवा झेंडा
वाराणसी, ८ नोव्हेंबर (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. नवीन वंदे भारत ट्रेन प्रवासाचा वेळ कमी करणार आहेत. प्रादेशिक गतिशीलता वाढवतील आणि अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी


वाराणसी, ८ नोव्हेंबर (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. नवीन वंदे भारत ट्रेन प्रवासाचा वेळ कमी करणार आहेत. प्रादेशिक गतिशीलता वाढवतील आणि अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर संपूर्ण वाराणसी रेल्वे स्टेशन हर हर महादेव च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.

पंतप्रधानांनी सकाळी ८:४८ वाजता देशाला चार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन वाराणसी-खजुराहो, लखनऊ-सहाराणपूर, फिरोजपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बेंगळुरू दरम्यान धावतील. वाराणसी-खजुराहो वंदे भारत ट्रेन सध्या चालणाऱ्या विशेष ट्रेनच्या तुलनेत अंदाजे दोन तास आणि ४० मिनिटे वाचणार आहेत. हे देशातील काही सर्वात आदरणीय धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना जोडेणार आहे. जसे की, वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट आणि खजुराहो. खजुराहोला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

लखनौ-सहारापूर वंदे भारत हा प्रवास अंदाजे सात तास आणि ४५ मिनिटांत पूर्ण करेल, ज्यामुळे प्रवासाचा अंदाजे एक तासाचा वेळ वाचेल. यामुळे लखनौ, सीतापूर, शाहजहांपूर, बरेली, मुरादाबाद, बिजनौर आणि सहारनपूर येथील प्रवाशांना मोठा फायदा होईल आणि रुरकीमार्गे हरिद्वारला जाण्यासाठी त्यांचा प्रवेश देखील सुधारेल. मध्य आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सुरळीत आणि जलद आंतरशहर प्रवास सुनिश्चित करून कनेक्टिव्हिटी आणि प्रादेशिक विकास वाढविण्यात ही सेवा महत्त्वाची भूमिका बजावेल.

फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत ही या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन असेल, जी फक्त सहा तास आणि ४० मिनिटांत प्रवास पूर्ण करेल. यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि पंजाबमधील प्रमुख शहरे, जसे की फिरोजपूर, भटिंडा आणि पटियाला यांच्यातील कनेक्टिव्हिटी मजबूत होईल. या ट्रेनमुळे व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढतील अशी अपेक्षा आहे.

एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसमुळे दक्षिण भारतातील प्रवासाचा वेळ दोन तासांपेक्षा जास्त कमी होईल. या प्रवासाला आठ तास ४० मिनिटे लागतील. ही वंदे भारत एक्सप्रेस प्रमुख आयटी आणि व्यावसायिक केंद्रांना जोडेल. या मार्गामुळे केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील पर्यटन वाढेल.

वाराणसी ते खजुराहो ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस अनेक प्रकारे विशेष आहे. आठवा क्रमांक या ट्रेनशी संबंधित आहे. तिचे संचालन आध्यात्मिकदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदींनी शिवयोगादरम्यान भगवान शिव (काशी) शहरापासून शिवाचे निवासस्थान (मातंगेश्वर महादेव मंदिर), खजुराहो येथे जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला.

वाराणसीमध्ये असलेले भारतीय रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणाले, आमच्याकडे देशभरात आधीच १५६ वंदे भारत एक्सप्रेस सेवा आहेत आणि आठ नवीन सेवा जोडल्याने आता एकूण १६४ होतील. आज पंतप्रधान वाराणसी-खजुराहो वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय, आम्ही लखनऊ-सहारापूर वंदे भारत एक्सप्रेस, फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस आणि एर्नाकुलम-कोइम्बतूर-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस सुरू करत आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande