
पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।क्वांटम संगणकासाठी आवश्यक ‘क्यू-बीट्स’ विकसित करण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. ‘ट्रॅप्ड आयन्स’ या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रथमच पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी स्वदेशी २५ क्यू-बीट्स तयार केले आहेत. यामुळे आता क्वांटम गेट्स आणि संगणक विकसित करता येईल.‘आयसर’चे प्रा. डॉ. उमाकांत रापोल यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. औषधनिर्माण, संरक्षण, हवामान, वित्तीय प्रणाली, अवकाश आदी क्षेत्रातील अत्यंत जटिल आणि प्रगत संशोधनासाठी सुरक्षित व सक्षम पर्याय म्हणून ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’कडे पाहिले जाते. अमेरिका, युरोप, रशिया आणि चीनमध्ये यावर संशोधन चालू असून आता भारतानेही या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. प्रा. रापोल सांगतात, ‘‘क्वांटम बीट्स विकसित करण्यासाठी आम्ही ‘ट्रॅप्ड आयन्स’ हे तंत्रज्ञान निवडले. कॅल्शियम मूलद्रव्याच्या आयनचा त्यासाठी वापर करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु