थिलोरी जि.प.सर्कल एससी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांचे ढोल थंडावले
अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.) दर्यापूर नगर परिषद निवडणूक रणसंग्राम संपन्न होताच आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच डोहाळे राजकीय पुढारी यांना लागले आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सर्वच ४ सर्कल एससी करीता राखीव झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांध
थिलोरी जि.प.सर्कल एससी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांचे ढोल थंडावले


अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.) दर्यापूर नगर परिषद निवडणूक रणसंग्राम संपन्न होताच आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच डोहाळे राजकीय पुढारी यांना लागले आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सर्वच ४ सर्कल एससी करीता राखीव झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेलेइच्छुक उमेदवार यांचे ढोल थंडावले आहेत.पण दह्याची भूक टाकावर भागविणे सारखे अनेक इच्छुक उमेदवार यांनी पंचायत समिती कडे आपला मोर्चा वळविला आहे.त्यामध्ये थिलोरी पंचायत समिती सर्कल ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी दिसून येत आहे.या निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना उबाठा पक्षातर्फे युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश कावडकर,राष्ट्रीय काँग्रेस तर्फे वैष्णवी स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष डॉ.अविनाश ठाकरे,शशांक पाटील धर्माळे,भाजप तर्फे थिलोरीचे माजी उपसरपंच अनिल होले व इतर अनेक उमेदवार अपक्ष म्हणून लढणार आहेत.तसेच जिल्हा परिषद एससी झाल्याने या प्रभागातून काँग्रेस तर्फे लेहगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्या सौ मंदाताई बळवंत वानखडे,शिवसेना उबाठा पक्षा तर्फे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा खोलापूर ग्राम पंचायत सदस्या अलका निलेश पारडे, भाजपा तर्फे तर्फे सौ शोभाश्रीरामजी नेहर नांदेड यांच्या पत्नी वंचित आघाडी तर्फे माझी पंचायत समिती सभापती सौ रेखाताई साहेबराव वाघ पांजर ह्या रिंगणात उतरतील असे चित्र असल्याचे दिसून येत आहे.कोण कोणत्या पक्षाच्या गळ्याला लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे कुठल्या कुठल्या पक्षातर्फे युती होत्यात हे अजून उद्या नक्की नाही आहे त्यामुळे तसं झाल्यास पुन्हा उमेदवार कमी होण्याची शक्यता आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande