
-जिल्ह्यातील 1 लाख 29 हजार 436 लाभार्थ्यांना मिळणार लाभ
अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ४६६ अंत्योदय कार्डधारकांना तब्बल वर्षभरानंतर रेशनची साखर गोड होणार आहे. यासाठी पुरवठा विभागाने सहा महिन्यांचे नियतन मंजूर केले आहे. यामध्ये डिसेंबर महिन्यापासून मे महिन्यापर्यंत दरमहा एक किलो साखर २० रुपये किलोने मिळणार आहे.
यासाठी पुरवठा विभागाकडे पुरेशी साखर उपलब्ध झाली आहे. टेंडरअभावी गत वर्षापासून रेशन दुकानातून साखर वितरण बंद होते. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या तीन महिन्यांचे साखर नियतन मंजूर झाले व साखरेचे दर महिन्याला वितरण होणार आहे. यावर्षी दिवाळी, दसरा त्यापूर्वी गुढीपाडवा, होळीला आनंदाचा शिधा मिळालेला नाही. त्यातच दिवाळीला देखील रेशन दुकानात साखर मिळाली नव्हती. त्यामुळे लाभार्थीची नाराजी होती. आता मात्र तिढा सुटताच साखर उपलब्ध झाली आहे.
साखरेसाठी बाजारात ४४ एक रुपये मोजावे लागतात. मात्र, रेशन दुकानातून २० रुपये प्रति किलोने साखर मिळणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात साखर उपलब्ध झाली आहे. लवकरच रेशन दुकानातून साखरेचे वाट सुरू होणार आहे.
तालुका लाभार्थी
अमरावती शहर ८३२० अमरावती ग्रा. ७०६२ भातकुली ४६५४ नांदगाव खंडेश्वर ५२८१ चांदूर रेल्वे ४३५६ धामणगाव रेल्वे ५४६१ तिवसा ४४०१ अचलपूर ६७२८ चांदूर बाजार ८५५४ दर्यापूर ६३८२ अंजनगाव सुर्जी ६२१६ वरुड ८३२५ मोर्शी ८०७१ धारणी २६,३१९ चिखलदरा १३२८४ इत्यादी तालुका लाभार्थी आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी