रोमियो लेन नाईटक्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना दिल्ली कोर्टाकडून अंतरिम दिलासा नाही
नवी दिल्ली, 10 डिसेंबर (हिं.स.)रविवारी मध्यरात्री गोव्यातील प्रसिद्ध बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये भीषण आग लागल्यानंतर देश सोडून पळून गेलेल्या सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा या दोघांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयीन संरक्षण मागितले आहे. त्यांनी या घटनेल
गोवा क्लब आगीचे आरोपी गौरव आणि सौरभ लुथरा


नवी दिल्ली, 10 डिसेंबर (हिं.स.)रविवारी मध्यरात्री गोव्यातील प्रसिद्ध बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये भीषण आग लागल्यानंतर देश सोडून पळून गेलेल्या सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा या दोघांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयीन संरक्षण मागितले आहे. त्यांनी या घटनेला जबाबदार नसल्याचे सांगत न्यायालयात पीडितेचे कार्ड खेळले. तथापि, न्यायालयाने तात्काळ दिलासा नाकारला आणि पोलिसांकडून प्रतिसाद मागितला. या याचिकेवर गुरुवारी पुढील सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.

गोवा नाईटक्लब आगीत पंचवीस जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. ज्यात २० कर्मचारी आणि पाच पर्यटकांचा समावेश आहे. या मोठ्या घटनेनंतरही, क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा काही तासांनंतर इंडिगोच्या विमानाने दिल्लीहून थायलंडला पळून गेले. पोलिसांनी इंटरपोलद्वारे त्यांच्याविरुद्ध ब्लू नोटीस जारी केली आहे.

आता लुथरा बंधूंनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामीन आणि भारतात परतण्याची परवानगी मागण्यासाठी याचिका दाखल केली आहे. याचिकेत असा युक्तिवाद केला आहे की, आगीच्या वेळी ते नाईटक्लबमध्ये उपस्थित नव्हते म्हणून त्यांच्यावर फौजदारी जबाबदारी लादता येणार नाही.

लुथरा बंधूंनी कोणते युक्तिवाद केले?

त्यांचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील तनवीर अहमद मीर यांनी न्यायालयाला सांगितले की, क्लब लुथरा बंधू चालवत नाहीत, तर त्यांचे तीन व्यावसायिक भागीदार आणि एक व्यवस्थापक चालवतात. त्यांनी असा युक्तिवादही केला की लुथरा बंधू अनेक व्यवसायात सहभागी आहेत परंतु कोणत्याही युनिटचे दैनंदिन कामकाज ते वैयक्तिकरित्या हाताळत नाहीत. क्लबच्या कामकाजाची जबाबदारी फ्रँचायझी व्यवस्थापकांवर आहे. ज्या क्लबमध्ये आग लागली तो क्लब देखील याच व्यवस्थेनुसार चालवला जात होता. जर क्लबमध्ये कोणतीही घटना घडली तर त्याची फौजदारी जबाबदारी लुथरा बंधूंवर नाही तर क्लबचे व्यवस्थापन करणाऱ्या भागीदारांवर किंवा व्यवस्थापकांवर असते. दोन्ही भावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने आठवण करून दिली की गोवा क्लबच्या ऑपरेशनल मॅनेजर्सना आधीच अटक करण्यात आली आहे.

लुथरा बंधूंच्या वतीने ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा देखील न्यायालयात हजर झाले. ते म्हणाले, आमची एकमेव साधी मागणी आहे की, आरोपींना देशात परतण्याची आणि गोव्यातील स्थानिक न्यायालयात हजर राहण्याची परवानगी द्यावी. ते देखील या दुर्घटनेचे बळी आहेत. आम्हालाही या दुर्घटनेचे दुःख आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande