
धुळे, 11 डिसेंबर, (हिं.स.) - महानगरपालिका निवडणुकीची धामधुम आता लवकरच सुरुहोत असून आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, धुळे महानगरतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासुन सुरुवात होत असल्याची माहिती महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दिली आहे. भाजपतर्फे प्रत्येक प्रभागातून मोठ्या संख्येने ईच्छुक उमेदवारांची नाव नोंदणी यापुर्वीच झाली आहे. भाजपमध्ये मोठी स्पर्धा तिकीटासाठी दिसत आहे. आता प्रत्यक्ष इच्छुकांच्या मुलाखती सुरु होत असल्याने कोणत्या प्रभागात कोण कोण इच्छुक पुढे येवून मुलाखत देणार याकडे लक्ष लागले आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालक मंत्री धुळे जिल्हा जयकुमारजी रावल, प्रदेशमहामंत्री विजयजी चौधरी, प्रदेश संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, धुळे शहराचे आ.अनुपभैय्या अग्रवाल, आ. रामदादा भदाणे, माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तथा माजी खा. डॉ. सुभाषजी भामरे, माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे, माजीआमदार कुणालबाबा पाटील, यांच्या आदेशाने तसेच भाजपा धुळे महानगराचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली धुळे महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, धुळे महानगर तर्फे आजपासून इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर मुलाखत प्रक्रिया आज दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून ते रात्री १० वाजे पयरत आणि उद्या दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासुन ते रात्री १० वाजेपयरत होणार असून, महानगरातील सर्व प्रभागांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची प्रभागनिहाय व नियोजनबद्ध पद्धतीने मुलाखत घेण्यात येणार असून, यासाठी पक्षाने विशेष मुलाखत समितीची स्थापना केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या ज्या ईच्छुक उमेदवारांनी पक्षाचा परिचय फॉर्म भरुन नोंदणी केलेली आहे अशा सर्व उमेदवारांना संपर्क करून मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल, याची सर्व ईच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी. पक्षाकडून निवड प्रक्रिया पूर्ण पारदर्शकता, शिस्त आणि संघटनाच्या धोरणांनुसार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महानगरपालिका निवडणूक ही धुळे शहराच्या विकासासाठी महत्वाची आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर