इंदूर-पुणे महामार्गावर मनमाडनजीक पुन्हा वाहतूक कोंडी
कन्नड घाट नांदगाव येवला महामार्ग बंद मनमाड, 13 डिसेंबर (हिं.स.)। - मनमाड शहरातील जनतेच्या पाचवीला पुजलेला प्रश्न म्हणजे शहरांतून जाणारा इंदूर पूणे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी मुळात सर्वात सोपा आणि सोयीस्कर असलेला महामार्ग म्हणून वाहनचालकांची
मनमाडला इंदूर पुणे महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी कन्नड घाट नांदगाव येवला महामार्ग बंद असल्याने वाहतूक कोंडी


कन्नड घाट नांदगाव येवला महामार्ग बंद

मनमाड, 13 डिसेंबर (हिं.स.)।

- मनमाड शहरातील जनतेच्या पाचवीला पुजलेला प्रश्न म्हणजे शहरांतून जाणारा इंदूर पूणे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी मुळात सर्वात सोपा आणि सोयीस्कर असलेला महामार्ग म्हणून वाहनचालकांची पहिली पसंती हा महामार्ग आहे त्यात न्यायालयाने धुळे छत्रपती संभाजी नगर दरम्यान कन्नड घाट बंद केला आहे नांदगाव छत्रपती संभाजी नगर महामार्गावर दुरुस्ती सुरू असल्याने तोही बंद आहे आणि येवला नांदगाव हा महामार्ग देखील 18 दिवसासाठी बंद केल्याने मनमाड शहरातील इंदूर पूणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वळवली असल्याने याचा नाहक त्रास मनमाडकर जनतेला होत आहे शालेय विद्यार्थी कामावर जाणाऱ्या चाकरमानी यांच्यासह रोज दक्षिण भागांतून मार्केटमध्ये जाण्यासाठी असणारा रेल्वे ओव्हरब्रिज देखील जाम होत आहे यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.याकडे खासदार आमदार या लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य मनमाडकर जनतेकडून करण्यात येत आहे.

मनमाड शहरातील वाढती लोकसंख्या शहरातून जाणारा इंदूर पूणे महामार्ग यामुळे मनमाड शहरात रोज वाहतूक कोंडी होऊन मोठा जाम लागत आहे याचा फटका बाहेरील वाहनधारकांना बसतोच मात्र शहरातील नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसतो आहे शहरातील दोन्ही भागांत वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असुन यामुळे मनमाडकर जनता मात्र होरपळून निघत आहे उच्च न्यायालयाने बंद केलेला कन्नड घाट नांदगाव छत्रपती संभाजी नगर रस्त्याची झालेली दुरवस्था व अठरा दिवसाकरिता बंद करण्यात आलेला नांदगाव येवला महामार्ग यामुळे इंदूर पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली असुन शहरातील नागरिकांना या वाहतूकीचा फटका बसत आहे मुळात शहरातील रस्ते आधीच अरूंद आहेत त्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वाहतूक यामुळे इंदूर पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत या सर्व गोष्टीचा मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे शहरातील सुरुवात रोज सकाळी वाहतूक कोंडीने होते आहे याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष केंद्रित करुन या सर्व जाचातुन आम्हाला मुक्तता द्यावी अशी मागणी सर्वसामान्य मनमाडकराच्या वतीने करण्यात येत आहे.

ही आहेत वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे

◆ मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गचा मालेगाव येथून कट होऊन मनमाडमार्गे सोपा रस्ता असल्याने वाहनचालकांची पहिली पसंती असलेला महामार्ग

◆धुळे छत्रपती संभाजी नगरला जोडणारा कन्नड घाट वाहतुकीसाठी बंद

◆मालेगाव नांदगाव मार्गे छत्रपती संभाजी नगरला जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था

◆मनमाड मार्गे पुणे सोलापूर बेळगावला जाण्यासाठी सोपा आणि बिनाघाट असलेला महामार्ग

◆मोजकेच टोल आणि रस्ता चांगला असल्याने या महामार्गाचा जास्तीचा वापर...

◆ नुकताच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला येवला नांदगाव राज्यमहामार्ग

मनमाडला वाहतुकीचे वेगळे नियम आहेत का...?

राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहन चालवताना शहरातुन जर रस्ता जात असेल तर त्या ठिकाणी अवजड वाहनांसाठी वेगळे नियम आहेत यामध्ये प्रामुख्याने अवजड वाहनांना प्रवेश बंदी व वेळ मर्यादा,विशिष्ट मार्गावर प्रवेश निषेध यासह वेग मर्यादा मागे पुढे एस्कॉर्ट वाहन असे नियम आहेत मात्र मनमाड शहरातुन जाणाऱ्या वाहनांना हे नियम लागू होत नाही का.? असा सवाल उपस्थित केला जातो आहे मुळात मनमाड शहरात ज्या पोलिसांवर हे वाहन रोखण्याची जबाबदारी असते तेच या वाहनांना एस्कॉर्ट करून दिवसा रात्री कधीही घेऊन जातात यामुळे शहरातील अतिशय छोट्या महामार्गावर या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते यामुळे शहरातील जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे यामुळे मनमाडला वाहतुकीचे वेगळे नियम आहेत का ..? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande