बीएमडब्ल्यू एम४४०आय कन्व्हर्टिबल भारतात 2026 मध्ये लाँच होणार
मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)। लग्जरी कार निर्माता बीएमडब्ल्यू इंडिया पुढील वर्षी भारतीय बाजारात आपली प्रीमियम बीएमडब्ल्यू एम४४०आय एक्सड्राइव कन्व्हर्टिबल सादर करण्याच्या तयारीत आहे. जागतिक स्तरावर बीएमडब्ल्यू झेड४ चा सक्सेसर येण्याची शक्यता असली तरी
BMW M440i Convertible


BMW M440i Convertible


BMW M440i Convertible


मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)। लग्जरी कार निर्माता बीएमडब्ल्यू इंडिया पुढील वर्षी भारतीय बाजारात आपली प्रीमियम बीएमडब्ल्यू एम४४०आय एक्सड्राइव कन्व्हर्टिबल सादर करण्याच्या तयारीत आहे. जागतिक स्तरावर बीएमडब्ल्यू झेड४ चा सक्सेसर येण्याची शक्यता असली तरी तो भारतात आणण्याची सध्या कोणतीही योजना नाही. त्यामुळे कंपनी 2026 मध्ये एम४४०आय कन्व्हर्टिबलवरच लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.

बीएमडब्ल्यू एम४४०आय कन्व्हर्टिबलचे डिझाइन बीएमडब्ल्यू ४-सिरीज कूपवर आधारित असून त्यात स्पोर्टी आणि आक्रमक स्टायलिंग एलिमेंट्स पाहायला मिळतात. या कारमध्ये फोल्डिंग फॅब्रिक रूफ देण्यात आली असून ती 50 किमी प्रतितास वेगापर्यंत अवघ्या 18 सेकंदांत उघडता किंवा बंद करता येते. समोरच्या बाजूला डायग्नल DRL सिग्नेचर असलेल्या स्लिम LED हेडलॅम्प्स, मोठे किडनी ग्रिल्स आणि बम्परच्या दोन्ही बाजूंना मोठे एअर इनटेक्स देण्यात आले आहेत. साइड प्रोफाइलमध्ये 19-इंच अलॉय व्हील्स, फेंडरवर M बॅजिंग आणि पुढील सीट्सच्या मागे विंड डिफ्लेक्टर दिसतो. मागील बाजूस स्लीक LED टेललॅम्प्स, इंटिग्रेटेड बूटलिड स्पॉइलर आणि मस्क्युलर रियर डिफ्यूझर देण्यात आला आहे.

इंटीरियरबाबत बोलायचे झाल्यास बीएमडब्ल्यू एम४४०आय कन्व्हर्टिबल मध्ये चार प्रवासी बसू शकतात. केबिन लेआउट प्रीमियम आणि आधुनिक असून 14.9-इंच कर्व्हड इंफोटेनमेंट टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि तीन-स्पोक फ्लॅट-बॉटम M-स्पेक स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहे. फीचर्समध्ये 12-स्पीकर हरमन कार्डन साउंड सिस्टम, वायरलेस चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, मेमरी फंक्शनसह पावर्ड स्पोर्ट्स सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि एम्बिएंट लाइटिंग यांचा समावेश आहे.

पॉवरट्रेनच्या बाबतीत एम४४०आय कन्व्हर्टिबल मध्ये बीएमडब्ल्यू एम३४०आय सेडानमधीलच 3.0-लीटर B58 टर्बो स्ट्रेट-सिक्स इंजिन दिले जाणार आहे. हे इंजिन 374 हॉर्सपावर आणि 500 Nm टॉर्क निर्माण करते. याला 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि xDrive ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम जोडण्यात आली आहे. या सेटअपमुळे ही कन्व्हर्टिबल कार अवघ्या 4.9 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते, तर तिची टॉप स्पीड 250 किमी प्रतितास इतकी इलेक्ट्रॉनिकली लिमिटेड आहे.

बीएमडब्ल्यू एम४४०आय कन्व्हर्टिबल भारतात 2026 च्या मध्यात लाँच होण्याची शक्यता असून तिची अंदाजे किंमत सुमारे 1.1 कोटी रुपये असू शकते. या किंमत श्रेणीत ती थेट मर्सिडीज-बेंझ सीएलई कॅब्रिओलेटला कडवी टक्कर देईल, ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.12 कोटी रुपये आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande