
नागपूर, १४ डिसेंबर (हिं.स.) : राज्य विधिमंडळाचे ८ डिसेंबरला सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाचे अखेर आज, रविवारी सूप वाजले. आता पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत पार पडणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाजाचा आढावा घेतला. त्यात सांगितले की, सात दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात, कनिष्ठ सभागृहाचे कामकाज 72 तास 35 मिनिटे चालले, दररोज सरासरी 10.22 तास चालले, तर फक्त 10 मिनिटे वाया गेली. विधानसभेत मांडण्यात आलेल्या 18 विधेयकांपैकी 16 विधेयके मंजूर करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि. 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरु होणार आहे, अशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती नार्वेकरांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी