केजच्या अहिल्यानगरातील विजेचा प्रश्न सुटणार
बीड, 14 डिसेंबर (हिं.स.)। केज शहरातील उमरी रोड भागात वाढत्या विस्तारामुळे व विजेच्या मागणीमुळे सतत ट्रान्सप ट्रान्सफार्मर जळून विजेचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून २०० केव्हिए क्षमतेचा ट्रान्सफार्मर उपलब्ध झा
बीड


बीड, 14 डिसेंबर (हिं.स.)।

केज शहरातील उमरी रोड भागात वाढत्या विस्तारामुळे व विजेच्या मागणीमुळे सतत ट्रान्सप ट्रान्सफार्मर जळून विजेचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून २०० केव्हिए क्षमतेचा ट्रान्सफार्मर उपलब्ध झाला आहे. अहिल्यानगर भागात ट्रान्सफार्मर उभारणीचे भूमिपूजन युवानेते अक्षय मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या ट्रान्सफार्मरमुळे या भागात उच्च दाबाने व अखंडितपणे विद्युत पुरवठा होणार असल्याने विजेचा कायमस्वरूपी सुटणार आहे. या भागाचा कायमस्वरूपी विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांच्या माध्यमातून २०० केव्हिए क्षमतेचा ट्रान्सफार्मर उपलब्ध झाला आहे. उमरी रोडवरील अहिल्या नगर भागात या नवीन २०० केव्हिए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर उभारणीचे भूमिपूजन युवानेते अक्षय मुंदडा यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंदडा यांनी महावितरणच्या कामाचा आढावा घेतला आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. कार्यक्रमाला महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एम. जी. सय्यद, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल गदळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी, भाजपचे तालुका सरचिटणीस सुनील घोळवे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande