
बीड, 14 डिसेंबर (हिं.स.)ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रसाद चिक्षे यांची धाराशिव येथील लोकसेवा समितीच्या वतीने दिला जाणारा मराठवाडा पातळीवरील 'लोकसेवा पुरस्कार २०२५' साठी निवड झाली आहे. शिक्षण, जलसंधारण आणि भटके-विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या ३० वर्षांच्या योगदानाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात येत आहे.येत्या २४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता धाराशिव येथील प्रमोद महाजन सभागृहात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल. लोकसेवा समितीचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली असून, अंबाजोगाईसह जिल्ह्यातून चिक्षे यांचे अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis