अचलपूरातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती
अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.)। अचलपूर विधानसभा मतदारसंघातील वर्षानुवर्षे दायित्वाअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना अखेर गती मिळाली असून, आमदार प्रवीण तायडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. हिवाळी अधिवेशनात आमदार तायडे यांनी या प्रकल्पा
अचलपूरातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती; आमदार प्रवीण तायडे यांच्या प्रयत्नांना यश, जलसंपदा मंत्र्यांची हिरवी झेंडी


अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.)।

अचलपूर विधानसभा मतदारसंघातील वर्षानुवर्षे दायित्वाअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना अखेर गती मिळाली असून, आमदार प्रवीण तायडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. हिवाळी अधिवेशनात आमदार तायडे यांनी या प्रकल्पांसाठी ठामपणे मागणी मांडताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित सर्व मागण्यांना तात्काळ मंजुरी देत हिरवी झेंडी दाखवली.

अचलपूर मतदारसंघातील बोर्डी नाला प्रकल्प, राजुरा प्रकल्प, राजनापूर्णा बॅरेज प्रकल्प आणि वासनी मध्यम प्रकल्प असे चार प्रमुख सिंचन प्रकल्प केवळ दायित्वाअभावी अनेक वर्षांपासून रखडलेले होते. परिणामी सुमारे ११,९३० हेक्टर शेती क्षेत्र सिंचनापासून वंचित राहिले असून हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसत होता.वासनी मध्यम प्रकल्पावर आतापर्यंत ६४३.५१ कोटी रुपयांचा खर्च झालेला असून या प्रकल्पामुळे ५,०४३ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. मात्र सन २०१६–१७ पासून निधीअभावी काम थांबले होते. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ६५.६५ कोटी रुपयांचे दायित्व मंजूर करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार तायडे यांनी सभागृहात ठामपणे मांडले. तसेच उर्वरित बोर्डी नाला, राजनापूर्णा बॅरेज आणि राजुरा प्रकल्पांना तुलनेने अल्प निधीची आवश्यकता असून ते तातडीने पूर्ण करता येतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.सिंचनाच्या अभावामुळे कोरडवाहू शेती करणारा शेतकरी आजही निसर्गाच्या भरवशावर असल्याचे नमूद करत, हे प्रकल्प पूर्ण झाल्यास शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम होईल, असा विश्वास आमदार प्रवीण तायडे यांनी व्यक्त केला. जलसंपदा मंत्र्यांच्या सकारात्मक निर्णयामुळे अचलपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ‘जलसंजीवनी’ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande