येवला वीज मंडळ कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
येवला, 16 डिसेंबर, (हिं.स.)येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या विद्युत पुरवठ्याच्या समस्यांबाबत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी रिपब्लिकन व राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आक्रोश मोर्चा मंगळवारी सकाळी विंचूर चौफुली येथून डॉक्टर बाबा
शेतकऱ्यांचा धडक मोर्चा येवला वीज मंडळ कार्यालयावर


येवला, 16 डिसेंबर, (हिं.स.)येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या विद्युत पुरवठ्याच्या समस्यांबाबत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी रिपब्लिकन व राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आक्रोश मोर्चा मंगळवारी सकाळी विंचूर चौफुली येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून धडक वीज मंडळ कार्यालय येवला येथे नेण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली.

रात्री बिबट्याची दहशत आणि थंडीची लाट असल्याने शेतात काम करणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी रात्रीचा विद्युत पुरवठा तात्काळ रद्द करून तो दिवसा विद्युत पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एडवोकेट माणिकराव शिंदे यांनी वीज मंडळ अधिकाऱ्यांना पाच दिवसाच्या अल्टिमेट दिला आहे. सदर विज पुरवठा न मिळाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. शिवसेना प्रणित शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, शिवसेना शहर ग्रामीण आदींनी मोर्चाला पाठिंबा दिला. महेंद्र काले, पांडुरंग शेळके, श्रावण देवरे, गोरख पवार, संजय सालमुठे, शाहू शिंदे, सुभाष निकम, डॉक्टर महेश जोशी, महेश काळे, रामदास पवार, सुरेश कदम, सांग राणी शिंदे, नीलमा पाटील अधिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande