
छत्रपती संभाजीनगर, 16 डिसेंबर, (हिं.स.)छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला असल्याचे दिसते आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या चिरंजीवांना महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.एकाच प्रभागात या दोन चिरंजीवांना उमेदवारी हवी आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसते आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पूर्वी मैत्रीसाठी आमदारकीची उमेदवारी धुडकावणारे नेते आता आपल्या मुलांना उमेदवारी मिळावी यासाठी आमने-सामने आले आहेत. विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यात मुलांच्या उमेदवारीवरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.जुनी मैत्री आणि सध्याची राजकीय गणिते यामध्ये संघर्ष निर्माण झाला असून, उमेदवारीवरून सुरू असलेल्या या मुद्द्यावर राजकारण रंगत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis