
अमरावती, 16 डिसेंबर, (हिं.स.)। नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता दि. 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान केंद्र असणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना दि. 19 आणि 20 डिसेंबर रोजी दोन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, अचलपूर, वरुड, दर्यापूर, आणि धारणी येथील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेले मतदान अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्य घेऊन केंद्राचा ताबा घेणार असल्याने दोन दिवसांची सुट्टी असणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी