क्षयरोग तपासणी केवळ 53 टक्के; केंद्र सरकारची राज्याला कडक ताकीद
पुणे, 19 डिसेंबर (हिं.स.)। क्षयरोग तपासणी मोहीम जवळपास वर्षभर सुरू आहे. आत्तापर्यंत राज्यात 53 टक्के लोकसंख्येचीच तपासणी झाल्याने केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली आहे. तीन शिफ्टमध्ये काम करा; पण तपासणी मोहीम पूर्ण करा, असे निर्देश केंद्राने राज्य सर
क्षयरोग तपासणी


पुणे, 19 डिसेंबर (हिं.स.)। क्षयरोग तपासणी मोहीम जवळपास वर्षभर सुरू आहे. आत्तापर्यंत राज्यात 53 टक्के लोकसंख्येचीच तपासणी झाल्याने केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली आहे. तीन शिफ्टमध्ये काम करा; पण तपासणी मोहीम पूर्ण करा, असे निर्देश केंद्राने राज्य सरकारला दिले आहेत.सार्वजनिक आरोग्य विभागासाठी पुरेसे कर्मचारी, पोर्टेबल एक्स-रे मशिन आणि आवश्यक साहित्य यांचा अभाव असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये काम करण्याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संभम आहे.

राज्यव्यापी क्षयरोग तपासणी मोहीम 7 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय क्षयरोगनिर्मूलन कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आली. रुग्ण लवकर शोधून काढणे आणि संसर्गाचा प्रसार रोखणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. सुरुवातीला ही मोहीम मार्च 2025 पर्यंत होती; मात्र नंतर ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली.महाराष्ट्राला 80 क्षयरोगप्रवण जिल्ह्यांमध्ये एकूण 2 कोटी 15 लाख असुरक्षित लोकसंख्येची तपासणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण आणि इतर असंसर्गजन्य आजार असलेले लोक यांचा असुरक्षित गटात समावेश होतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande