परभणी : सोनपेठ नगरपालिकेत 78.10 टक्के मतदान
परभणी, 2 डिसेंबर (हिं.स.) : सोनपेठ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह सदस्य पदाच्या निवडणूकीत एकूण मतदारांच्या संख्येच्या तूलनेत 78.10 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या पालिकेत 7 हजार 776 महिला, 7 हजार 872 पुरुष असे एकूण 15 हजार 618 मतदार
सोनपेठ नगरपालिकेत 78.10 टक्के मतदान : मतदानाच्या टप्प्यात मतदारांचा अभूतपूर्व उत्साह


परभणी, 2 डिसेंबर (हिं.स.) : सोनपेठ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह सदस्य पदाच्या निवडणूकीत एकूण मतदारांच्या संख्येच्या तूलनेत 78.10 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या पालिकेत 7 हजार 776 महिला, 7 हजार 872 पुरुष असे एकूण 15 हजार 618 मतदार आहेत. त्यापैकी 6 हजार 321 महिला, 5 हजार 877 पुरुष असे एकूण 12 हजार 198 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महिला मतदारांची टक्केवारी 81.60 तर पुरुष मतदारांची टक्केवारी 74.76 टक्के एवढी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande