
अकोला, 2 डिसेंबर (हिं.स.)।अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे मतदानाची वेळ संपल्यानंतर भारतीय जनता पार्टी च्या उमेदवाराच्या प्रतिनिधीकडून मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या संगमताने बंद दरवाजा करून भाजपा च्या उमेदवारा समोरील बटन दाबण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. तर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या बाबत बोलण्यासाठी नकार दिलाय.
मिळालेल्या अकोल्याच्या मुर्तीजापुर येथील प्रभाग क्रमांक १ च्या पंचायत समिती कार्यालय मतदान केंद्रावर सायंकाळी वेळ संपल्यावर भाजप उमेदवारा च्या प्रतिनिधी आणि मतदान केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून भाजप च्या उमेदवाराच्या समोरील बटन दाबून बोगस मतदान केल्याचा आरोप दुसऱ्या पक्षाच्या वतीने करण्यात आला.. यावेळी नागरिकांनी मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन व पंचायत समिती कार्यालयासमोर मोठी गर्दी केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रतिनिधी यांना मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावरून बाहेर पाठविण्यात आले.. मात्र भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रतिनिधी आणि कर्मचारी हे आतच होते आणि त्या नंतर आत भाजपच्या प्रतिनिधी व कर्मचारी यांनी संगमताने सदर प्रकार घडवून आणल्याचा राष्ट्रवादी ने केला.. यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे