अकोला - महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची बैठक संपन्न
अकोला, 20 डिसेंबर (हिं.स.)। विकसित अकोला संकल्पित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष च्या उमेदवारांना महानगरपालिका निवडणुकीमध्ये जनता जनार्दन निवडून देणार आहे कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कामाचा जोगावा मागून केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक लोकप्रतिनि
P


अकोला, 20 डिसेंबर (हिं.स.)।

विकसित अकोला संकल्पित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष च्या उमेदवारांना महानगरपालिका निवडणुकीमध्ये जनता जनार्दन निवडून देणार आहे कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कामाचा जोगावा मागून केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कामाचा पत्रक काढून घरोघरी पोहोचवा तसेच कार्यकर्ता हा महत्त्वाचा असून कार्यकर्त्यांची भावना समजणारा भारतीय जनता पक्ष असून भारत कार्यकर्त्यांच्या बळावर आज इतर पक्षाच्या कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात ही भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता आणि जनतेचा विश्वास असल्याची असल्याची प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

स्थानिक सिटी स्पोर्ट इथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जयंत मसने हे होते. तर मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, विजय अग्रवाल संतोष शिवरकर, किशोर पाटील, वैशालीताई शेळके, अर्चनाताई मसणे, आधी मंचावर विराजमान होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी 21 सुत्री, 21 सुत्री विजयाचा मंत्र देऊन वेगवेगळे कार्यक्रम देऊन महानगरपालिका जिंकण्याचा मार्ग मायक्रो प्लॅनिंग करण्याचा निर्देश दिला जनता जनार्दन देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामकाजावर खुश असून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळणार आहेत अशी ही नामदार बावनकुळे म्हणाले.

यावेळी बावनकुळे यांनी वेगवेगळ्या सरकार योजनेची माहिती दिली.

भाजपा कार्यकर्ता देव दुर्लभ : कोटेकर

भाजपा कार्यकर्ता हा देव दुर्लभ भ कार्यकर्ता असून पक्ष संघटनेसाठी राष्ट्रासाठी स्वतःला वाहून घेणारा कार्यकर्ता असून इतर पक्षापेक्षा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा आपलं व्यवसाय सांभाळून सामाजिक स्थायी व म्हणून राष्ट्र निर्माण यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर आज देशात सर्वात मोठी संघटना झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा भारतीय जनता पक्ष मोठा यश मिळेल आणि वेगवेगळे कार्यक्रम 31 डिसेंबर पर्यंत करण्याचा त्यांनी माहिती यावेळी दिली भारतीय जनता पक्ष प्रत्येक प्रभागात महिला तसेच प्रभाग न्याय मिळावे घेऊन सामाजिक समीकरणासोबत समाजातील वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधण्यासाठी कार्यकर्त्यांची टीम कार्यरत होणार असल्याची त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गडकरी तसेच राज्यातील इतर नेत्यांचे सुद्धा कार्यक्रम सभा होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. तसेच अकोला महानगराचा विशाल संमेलन सुद्धा घेण्याचा व शहरातील वेगवेगळ्या भागांशी नागरिकांशी संवाद साधण्याचा त्यांनी सांगितले

महायुती व्हावी यासाठी प्रयत्न करणार आमदार सावरकर

महायुती व्हावी ही प्रदेश आणि स्थानिक नेत्यांची इच्छा असून या दृष्टीने बोलणे सुरू आहे आणि लवकरच महायुतीचा आकार जनतेसमोर येणार असून भारतीय जनता पक्षाने त्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जबाबदारीने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे यश प्राप्ती करण्यासाठी तसेच अकोला महानगरात झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमासंदर्भात त्यांनी सांगून अकोला शहरातील वीज प्रभागापैकी 16 प्रभागांमध्ये पत्रक वाटप झाल्याचे सांगून कार्यकर्ता हा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी विजयासाठी असलेले मंत्र सांगून कार्यकर्ता हा महत्त्वाचा अंग असून कार्यकर्त्यांनी विजयाच्या दृष्टीने आम्हाला लागावे असे आवाहन केले. यावेळी विजय अग्रवाल यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर डॉक्टर अमित कावरे, वसंत बाचू का, कृष्णा शर्मा, माधव मानकर, एडवोकेट देव आशिष काकड, संजय ,गोटफोडे, रमेश अल्करी, आम्रपाली उपरवत संजय जोशी संजय शर्मा, सिद्धार्थ शर्मा डॉक्टर अभय जैन, डॉक्टर किशोर मालोकार विनोद मनवानी विराजमान होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande