रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्साहात साजरा
रायगड, 23 डिसेंबर (हिं.स.)। दि. 18 डिसेंबर रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस दरवर्षी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि शासनाच्या योजनांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने
जिल्ह्यात विविध ठिकाणी अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्साहात साजरा


रायगड, 23 डिसेंबर (हिं.स.)। दि. 18 डिसेंबर रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस दरवर्षी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि शासनाच्या योजनांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित केला जातो. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

उपक्रमाचा मुख्य उद्देश अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कांचे संरक्षण, समानता, सन्मान आणि जनजागृती करण्याचा होता. यावेळी नागरिकांना भारतीय संविधानातील कलम 29 व 30 नुसार अल्पसंख्यांकांना भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार, शैक्षणिक संस्था स्थापन व व्यवस्थापनाचा हक्क तसेच धर्मस्वातंत्र्य व समान संधी याबाबत माहिती देण्यात आली.

जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांनी नागरिकांना अल्पसंख्यांकांसाठी उपलब्ध शासकीय योजना, अनुदाने, शिष्यवृत्ती, सामाजिक उपक्रम, विद्यार्थी वस्ती, पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा व वैयक्तिक सहाय्य याबाबत माहिती दिली. नागरिकांनी त्यांच्या घटनात्मक हक्कांविषयी जाणून घेता यावे यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान समाजात सलोखा, बंधुता आणि सामाजिक एकात्मता वाढवण्याचे आवाहन करण्यात आले. विविधतेत एकता ही भारताची ओळख असून अल्पसंख्यांक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जिल्ह्यात आयोजित या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये अल्पसंख्यांक हक्कांविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, समाजात समानतेचा व सन्मानाचा संदेश रुजवण्यास महत्वाची पायरी ठरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande