पुणे - स्थानिक पातळीवर एकत्र येण्याबाबतच्या हालचालींना वेग
पुणे, 24 डिसेंबर (हिं.स.)। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र शहर पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. काही अटींवर काँग्रेसने तयारी दर्शविली असून, पहिल्या
पुणे - स्थानिक पातळीवर एकत्र येण्याबाबतच्या हालचालींना वेग


पुणे, 24 डिसेंबर (हिं.स.)। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र शहर पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. काही अटींवर काँग्रेसने तयारी दर्शविली असून, पहिल्या टप्प्यात काँग्रेसने ६८ जागांचा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ७६ जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) दिला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडीत एकत्र येण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर त्यावरून चर्चा सुरू असली, तरी स्थानिक पातळीवर त्या दृष्टीने गेल्या दोन दिवसांपासून हालचाली सुरू झाल्या आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या शहर पातळीवरील नेत्यांची एक प्राथमिक बैठक झाली. या बैठकीमध्ये संभाव्य आघाडीबाबत आणि जागा वाटपाबाबत चर्चा झाली. त्यामध्ये काही गोष्टींवर एकमत झाले असल्याचे कॉंग्रेसमधील सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, रात्री झालेल्या बैठकीत कॉंग्रेसने ६८ जागांचा, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (७६) जागांचा प्राथमिक प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिला. त्यावर पुढील बैठकांमध्ये चर्चेला सुरूवात होईल, असेही नेत्यांकडून सांगण्यात आले.---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande