
अकोला, 3 डिसेंबर, (हिं.स.)। शेतकरी हा देशाचा आत्मा असून अन्नदाता शेतकऱ्यांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खंबीरपणे उभी असताना उभे असताना शासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न अधिकारी शासकीय यंत्रणा करत असेल तर तो प्रकार सहन केल्या जाणार नाही शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातून आलेल्या अधिकाऱ्यांनी याची जाण ठेवून शेतकरी राजाला त्याच्या हक्काचे शेतमालाचे भाव मिळून देण्यासाठी शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करावी तसेच शासन आणि प्रशासन बदनाम होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या.
जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीसाठी खरेदी केंद्राची संख्या तातडीने वाढवून खरेदी प्रक्रिया गतिमान करावी... आमदार रणधीर सावरकर अशा तत्काळ सूचना देऊन अकोला जिल्ह्यात 39 ठिकाणी सेंटर सुरू करण्यात यावी प्रस्तावाला मदत देण्यात यावी यासाठी त्यांनी राज्याचे पणन मंत्री , सचिव तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय केल्या .
जिल्ह्यात शासनाच्या आधारभूत किमतीमध्ये सोयाबीन व कापूस खरेदी बाबत आमदार रणधीर सावरकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्या कक्षात सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेतली . त्यावेळी एचडी उपविभागीय अधिकारी उपविभागी अधिकारी डॉक्टर शरद जावळे उपस्थित होते यावेळी आमदार सावरकर यांच्या सूचनेची तात्काळ अमलबजावली अधिकाऱ्यांनी करावी शेतकऱ्यांना त्रास होत आहे कामा नये अशाही सूचना उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी दिले.
अकोला जिल्ह्यात सीसीआय मार्फत अकोट१, अकोट २, बोरगाव मंजू, बार्शी टाकळी, चिखलगाव, चोहट्टाबाजार , मूर्तिजापूर, पारस व तेल्हारा अशा एकूण ९ केंद्रांवर शासनाच्या आधारभूत किमतीमध्ये १ डिसेंबर 2025 पर्यंत एकूण एक लाख 38 हजार 272 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याची माहिती सीसीआय चे उपप्रबंधक ब्रिजेश कसाना यांनी दिली. कापूस खरेदी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जिनिंग प्रसिंग यांना सूचना करून शेतकऱ्यांच्या नोंदणी करिता स्लॉट उपलब्ध करून देण्यात यावे अशी सूचना आमदार रणधीर सावकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. जिल्ह्यातील केळीवेळी हे गाव ग्रामदान मंडळ कायद्यांतर्गत असल्याने शेतकऱ्यांच्या सातबारावर मालक म्हणून ग्रामदान मंडळ आणि भोगवटदार म्हणून शेतकऱ्याचे नाव आहे परंतु अशा शेतकऱ्यांची नोंदणी किसान कापूस अँपवर होत नसल्याने यामध्ये सुधारणा करण्याची सूचना सीसीआयचे अधिकाऱ्यांना आमदार सावरकरांनी केली, याकरिता तहसीलदार अकोट यांच्याकडून याबाबत आवश्यक तो खुलासा पत्राद्वारे घेऊन कापूस किसान ॲपवर तातडीने सुधारणा करून केळीवेळी येथील ग्रामदान मंडळात असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्याकरिता तातडीने सोय उपलब्ध करून देण्यात यावी अशी सूचना सुद्धा आमदार सावरकरांनी केली. जिल्ह्यात सोयाबीनची खरेदी अशी अतिशय धीम्या गतीने सुरू असल्यामुळे आमदार सावरकरांनी तिव्र नाराजी व्यक्त करीत सदरची बाब राज्याचे पणन मंत्री माननीय जयकुमार रावल यांना दूरध्वनीवरून अवगत केली.
जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्राची वाढ तातडीने मंजूर करावी अशी मागणी मा. जयकुमार रावल यांना केली असता मंत्री महोदयांनी सदरची मागणी तातडीने मंजूर करण्याच्या सूचना मुंबई येथील नाफेडचे अधिकाऱ्यांना केल्या. सोयाबीन खरेदी बाबत आढावा घेतला असता व्ही सी एम एफ या यंत्रणेद्वारे आज तारखेपर्यंत १० हजार क्विंटल, मार्केटिंग फेडरेशन द्वारे 1900 क्विंटल तर पनन महासंघाद्वारे फक्त 78 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पण महासंघाद्वारे जिल्ह्यात फक्त 11 केंद्रावर खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रत्यक्षात खरेदी अतिशय कमी असल्याबाबत मंत्री जयकुमार रावल यांच्या लक्षात आणून देत जिल्ह्यात खरेदी केंद्राची संख्या तातडीने मंजूर करून लवकरात लवकर खरेदी गतिमान करण्याकरिता संबंधित यंत्रणाना सूचना करण्याची विनंती मंत्री पणन यांना केली, यावर्षी आलेल्या सोयाबीनमध्ये ओलावा कमी अधिक असल्याने सर्व बाबींची शहानिशा करून खरेदी प्रक्रिया राबवावी शेतकऱ्यांना हा त्रास देऊ नये अशा सूचना आमदारांनी केल्या. सोयाबीन मधील ओलावा मोजण्याकरिता वापरण्यात येणारी यंत्रे एकसारखी व सुसुत्रीत नसल्याने प्रत्येक ठिकाणी वेगळे निकष लावण्यात येत आहेत ही बाब तातडीने दूर करावी अशा सूचना सुद्धा रणधीर सावरकर यांनी बैठकीत केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे