
अकोला, 3 डिसेंबर (हिं.स.)।
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख स्पर्धा परीक्षा फोरम चा 23 वर्धापन दिन दिनांक 6 डिसेंबर रोजी 2025 रोजी कृषी विद्यापीठातील के.बी.ठाकरे सभागृह येथे आयोजित केला असून विद्यापीठ हे सर्व समाजातील विद्यार्थ्यांचे असून 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले असून संपूर्ण देशावर दुःखाचे डोंगर कोसळले व त्या दिवसापासून संपूर्ण अनुयायी महापरिनिर्वाण दिनी कुठलाही उत्सव साजरा न करता महामानवास अभिवादन करून दुःख व्यक्त करतात.त्यामुळे आपण आयोजित केलेला कार्यक्रम हा दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी घेणे आंबेडकरी अनुयायांच्या भावनेच्या दृष्टीने चुकीचे असून सदर कार्यक्रम आपण पुढील तारखेला घेवुन संपूर्ण जनतेच्या विद्यार्थ्यांच्या भावनेचा आदर करून पुढे ढकलण्यात यावाअशी मागणी करण्यात आली मागनी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला.यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ सरचिटणीस ॲड.आकाश हिवराळे,शुभम गोळे ,रोहित पवार,सनी पवार, आदींनी निवेदनाद्वारे केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे