
जालना, 3 डिसेंबर (हिं.स.)।
जालना जिल्ह्यातील भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी सुधारित निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. कार्यक्रमानूसार प्रभाग क्र.1 अ व 9 ब साठी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दि.10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. दि.11 डिसेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. मतदान दि.20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 यावेळेत घेण्यात येईल. नगर परिषद मंगल कार्यालयात मतमोजणीसह निकाल दि.21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. आणि दि.23 डिसेंबर 2025 पुर्वी कलम 21 मधील तरतूदीनुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis