बीड - जरांगे पाटील यांनी घरत कुटुंबीयांचे केले सांत्वन
बीड, 3 डिसेंबर, (हिं.स.)। बीड तालुक्यातील मौजे महाजवाडी येथील अतुल घरत यांचे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघाती दुःखद निधन झाले होते.आज मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आज मराठा संघर्ष
Q


बीड, 3 डिसेंबर, (हिं.स.)। बीड तालुक्यातील मौजे महाजवाडी येथील अतुल घरत यांचे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघाती दुःखद निधन झाले होते.आज मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आज मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के होते.

अतुल यांच्या अकस्मात जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande