छ. संभाजीनगर - भाजपात युवा पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश
छत्रपती संभाजीनगर, 6 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध राजकीय पक्षांत कार्यरत असलेल्या अनेक ऊर्जावान व समर्पित युवा पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करून विकास, पारदर्शकता आणि सबळ राष्ट्र निर्माणाच्या प्रवासाला
Q


छत्रपती संभाजीनगर, 6 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध राजकीय पक्षांत कार्यरत असलेल्या अनेक ऊर्जावान व समर्पित युवा पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करून विकास, पारदर्शकता आणि सबळ राष्ट्र निर्माणाच्या प्रवासाला दृढ पाठिंबा दिला आहे.

हा भव्य प्रवेश सोहळा भाजपा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात, प्रेरणादायी वातावरणात आणि युवा शक्तीच्या उर्जेने संपन्न झाला. या कार्यक्रमात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. त्यांनी भाजपा नेतृत्वाच्या विकासकार्यक्षम धोरणांवर, सबळ संघटनावर आणि युवक-हिताच्या धोरणांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला.

या पक्ष प्रवेशामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा हा देखील एक महत्त्वपूर्ण आयाम ठरला. युवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक तरुणांनी पक्षाच्या विचारसरणीशी नवे नाते जोडले असून, त्यांच्या नेतृत्वातून नव्या उर्जेची मूल्यवर्धित भर पडली आहे.

युवा पदाधिकाऱ्यांच्या या प्रवेशामुळे शहरातील भाजपाचे संघटन आणखी भक्कम झाले असून, भविष्यातील राजकारणात युवा शक्तीची ठोस व सकारात्मक भूमिका अधिक प्रभावीपणे दिसून येणार आहे.

भारतीय जनता पार्टी सदैव युवांना संधी, मार्गदर्शन आणि नेतृत्व देते. त्यातूनच आजच्या तरुण पिढीला पक्षाकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनाचा अनोखा विश्वास दिसून येतो.असे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande