
पुणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी येथील प्रयोगशील आंबा उत्पादक शेतकरी भरत जाधव यांनी विकसित केलेल्या 'जुन्नर गोल्ड' या विशेष आंब्याच्या वाणाला केंद्र शासनाकडून शेतकरी जात म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे.
त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी विकसित पीक जाती संरक्षण कायद्या अंतर्गत नोंदणीसाठी प्रस्ताव तयार केला. यासाठी लागणारी तांत्रिक माहिती, प्रयोगशाळेतील नमुन्यांचे पृथक्करण आणि नाशिक येथील फळ व अन्न पदार्थ तपासणी करणाऱ्या 'अश्वमेघ इंजिनिअर्स व कन्सल्टट' यांच्या प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेला अहवाल आदि बाबींची पूर्तता करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.प्रयोगशील आंबा उत्पादक शेतकरी भरत जाधव यांनी बावीस वर्षां पुर्वी दोन हेक्टर जिरायत जमिनीत आंबा लागवड केली आहे. त्यांच्याकडे हापूस, केशर, राजापुरी, बदामी, लंगडा अशा विविध वाणांची ४०० हून अधिक झाडे आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण आंबा उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले जात असल्याने फळांचा स्वाद उत्कृष्ट आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीताफळ, डाळिंब यांसारखी पिके घेत जाधव यांनी जुन्नर गोल्डच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु