भाजपाकडून डोंबिवली शहरात सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या शुभारंभाचा धडाका
डोंबिवली, 8 डिसेंबर (हिं.स.)। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल थोड्या दिवसांत वाजणार असल्याने शहरात सिमेंटकाँक्रिट रस्त्यांच्या शुभारंभाचा धडाका भाजपाने लावला. रविवारी पूर्व आणि पश्चिम विभागात आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वि
Photo 4


Photo 3


Photo 2


Photo 1


डोंबिवली, 8 डिसेंबर (हिं.स.)। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल थोड्या दिवसांत वाजणार असल्याने शहरात सिमेंटकाँक्रिट रस्त्यांच्या शुभारंभाचा धडाका भाजपाने लावला. रविवारी पूर्व आणि पश्चिम विभागात आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन आणि जनसंपर्क कार्यालय उद्घाटन करून भाजपाने येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. प्रत्येक कार्यक्रमात भाजपा माध्यमातून होत असलेल्या विकास कामांचा लेखाजोखा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांसमोर मांडला.

पश्चिम विभागात माजी नगरसेविका विद्याताई राजेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून जाधव वाडी महाराजा गेट रस्ता, जाधव वाडी नं. १ शिवमंदिर रस्ता, बदाम गल्ली रस्ता येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, राजेश म्हात्रे, माजी नगरसेवक नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक संतोष केणे, युवा नेते अनमोल म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पूर्वेकडील सुनिलनगर विभागातील विद्यार्थ्यांसाठी माजी नगरसेविका अलका पप्पू म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून बहिणाबाई उद्यान येथे अभ्यासिका आणि वाचनालय उभारण्यात आले आहे. या विद्यार्थी वर्गाला समर्पित असणाऱ्या नूतन वास्तूचे उद् घाटन करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक मंदार टावरे, कविताताई मिलिंद म्हात्रे, ओमनाथ गजानन नाटेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच भाजपा पॅनल क्र. २९ मध्ये ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. हे जनसंपर्क कार्यालय परिसरातील नागरिकांसाठी सेवा, संपर्क आणि सुशासनाचे त्रिवेणी माध्यम ठरेल, असा विश्वास आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी अनिल उदयवार, धनाजी भोसले आणि माजी सैनिक अशोक माणिक म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. सदर कार्यक्रमासाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील स्थायी समिती माजी सभापती दीपेश म्हात्रे, अलकाताई पप्पू म्हात्रे, मंदार टावरे, ओमनाथ नाटेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र.२४ विभागासाठी आमदार रवींद्र चव्हाण तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या आमदार निधीतून भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल उपाध्यक्ष डॉ. सर्वेश शाहू सावंत यांच्या प्रयत्नातून सहयोग कॉर्नर (तुळशीराम शेठ बंगला) ते अंकिता को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी पहिल्या टप्प्या अंतर्गत सिमेंट काँक्रीटकरण तसेच ओम साई दर्शन ते राजाई टॉवर (सखाराम कॉम्प्लेक्स) गटार पुनर्बांधणी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.

------------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande